भाजप कार्यकारिणीची बैठक आजपासून दिल्लीत

नवी दिल्ली – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल-डिझेलच्या दरांसह चौफेर कोंडीत सापडलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची द्विदिवसीय बैठक आज शनिवारपासून दिल्लीत सुरू होत आहे. आधी ही बैठक 18 आणि 19 ऑगस्टला होणार होती. मात्र, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.

देशात लोकसभेसह विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच पेट्रोल-डिझेलचे दर सापशिडीच्या खेळाप्रमाणे चढत आहेत. मॉब लिंचींग, एससी-एसटी कायद्यामुळे सवर्ण सरकारवर नाराज झाले आहेत.
अशात, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस सुरवात होत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि निवडणुकीच्या सर्व अंगाने या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

बैठकीची सुरवात भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणाने होणार आहे. पहिल्या दिवशी शहा सर्व प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. यापूर्वीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होत आहे? यावर सर्वांचे मत ऐकून घेतले जाणार आहे. शिवाय, प्रदेशाध्यक्षांकडून प्रत्येक राज्यांचा रिपोर्ट सादर केला जाणार आहे.

भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी पत्रकारांना सांगितले की, कार्यकारणीची मुख्य बैठक दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाचे तमाम मोठे नेते यावेळी उपस्थित राहतील. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरम या चार राज्यांमध्ये निवडणूक होणे आहे. राजकीय आणि आर्थिक प्रस्ताव पारित केले जाणार आहेत. दुस-या दिवशी अर्थात रविवारी नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने बैठकीचे समापन होईल.

महत्वाचे म्हणजे, केंद्र सरकारच्या उपलब्धी जनतेपर्यंत पोहचविण्यावर भर दिला जाणार आहे. पायाभूत सोयींचा विकास, ग्रामीण आवास, उज्जवला योजना, शौचमुक्त खेडे आणि आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वाढलेला जीडीपीवर चर्चा होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)