भाजप उमेदवाराकडून पैसे घेण्यास नकार

नगर – प्रभाग क्रमांक- 13 मधून भाजपकडून महापालिका निवडणूक लढवत असलेल्या गायत्री कुलकर्णी यांना मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे देण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी मतदारानेच पोलिसात तक्रार दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे. भाजपविरोधात अशी तक्रार दाखल झाली आहे.

आज सकाळी सव्वादहा वाजता शहरातील भराड गल्ली परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी श्रीपाद अशोक सावंत यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पैसे वाटणाऱ्या अमृत खताडे याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. श्रीपाद सावंत व त्यांचा मित्र ऋषिकेश वाडेकर हे चौपाटी कारंजा येथे उभा असताना त्याठिकाणी अमृत खाताडे आला. नरेंद्र कुलकर्णी यांच्या पत्नी गायत्री या भाजपकडून उमेदवारी करत आहेत. त्यांना मतदान द्या, असे म्हणून त्याने सावंत व वाडेकर यांना दोन हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला. सावंत यांनी मात्र पैसे घेण्यास नकार दिला व भरारी पथकाला माहिती दिली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)