भाजप आमदार अनिल गोटे यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा

धुळे: भाजपाचे नाराज आमदार अनिल गोटे यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता धुळे महानगर पालिकेच्या रिंगणात अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा या महापौरपदासाठी लढणार आहेत, अशीही माहिती समोर आली आहे. भाजपाने अनिल गोटे यांना धुळ्यातल्या महापालिका निवडणुकांमधून डावलले. यानंतर नाराज झालेल्या अनिल गोटे यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे.

भाजपाने आपली फसवणूक केल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. त्यामुळेच त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. धुळे महापालिकेची 9 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल गोटे आणि भाजपा नेते व मंत्री सुभाष भामरे यांच्यात वाद सुरु आहे. त्यामुळेच गोटे यांनी राजीनामाही दिला होता. मात्र पक्षांमध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही आणि धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्त्वाखाली लढली जावी या दोन अटींवर आपण राजीनामा मागे घेतल्याचे त्यांनी म्हटले होते.

-Ads-

मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर आणि दोन अटी मान्य झाल्याने राजीनामा मागे घेतल्याचे अनिल गोटे यांनी म्हटले होते. मात्र आता नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे पक्षाविरोधात गोटे यांनी दंड थोपटल्याचेच चित्र आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
126 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
5 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)