भाजप आमदार अनिल गोटे नरमले

– मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर राजीनामा मागे

मुंबई  – हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा देणार अशी घोषणा करणारे भाजपाचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी अखेर नरमाईची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर दोन अटींवर गोटे यांनी आपला राजीनामा मागे घेतला. धुळ्यातील एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थित पक्षाविरोधात उघडपणे भूमिका घेत आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती.

-Ads-

भाजपात गुंडांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करणाऱ्या लोकांना पक्षात स्थानदिले जात असल्याबद्दल गोटे यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच धुळे महानगरपालिका निवडणूकीत गोटे यांनी स्वत:ला महापौरपदाचे उमेदवार घोषित केले होते. गोटे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पक्षात खळबळ उडाली होती. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला गोटे उपस्थित होते.

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल गोटे हे राजीनामा देणार नाहीत, चर्चेतून त्यांचे प्रश्न सोडवू असे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेमुळे आपण निर्णय बदलला असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हेगारांना भाजपात प्रवेश देणार नाही, धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका या गोटेंच्याच नेतृत्वात लढवल्या जातील, या अटी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या असल्याचे त्यांनी सांगत, यामध्ये दगाफटका झाल्यास पुन्हा आक्रमक होईल असा इशाराही त्यांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)