भाजप आमदाराचे केरळ बाबत वादग्रस्त विधान

थिरूवनंतपुरम – केरळात रस्त्यावर खुलआम गोहत्या केल्यामुळेच केरळला ही पुराची नैसर्गिक आपत्ती सोसावी लागली असल्याचे विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केले आहे. ते विजयपुराचे आमदार आहेत.

ते म्हणाले की हिंदुंच्या भावना दुखावण्यासाठी केरळात खुलेआम गोहत्या करून त्यांचे मास जाहींरपणे खाण्यात आले होते. त्यामुळेच वर्षभरात तेथे, पुराची भयानक आपत्ती आली. जो कोणी हिंदुंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करील त्याला अशाच परिणामांना समोरे जावे लागेल असे विधानही त्यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे देशातील लक्षावधी हिंदु गायीची मातेप्रमाणे पुजा करतात. पण हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी देशात मुद्दाम अनेक ठिकाणी गोहत्या केल्या जातात हा प्रकार पुर्ण निषेधार्ह आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर विविध ठिकाणाहून टीका केली जात आहे. केरळात हजारो लोक पुराच्या आपत्तीशी झुंजत असताना पाटील यांनी असे विधान करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार केला आहे असा आक्षेप त्यांच्यावर घेतला जात आहे. त्यांनी या आधीही अशी आक्षेपार्ह विधाने करून भाजपवर नामुष्की आणली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)