भाजप आणि विरोधकांसाठी पोटनिवडणुकांचा निकाल ठरणार महत्वाचा

लखनौ – देशातील दहा राज्यांत लोकसभेच्या चार आणि विधानसभांच्या नऊ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचा निकाल उद्या (गुरूवार) जाहीर होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आणि विरोधकांसाठी या निकालाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

पोटनिवडणुकांना सामोऱ्या गेलेल्यांत महाराष्ट्रातील पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पालघरमध्ये शिवेसना आणि भाजप हे मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने तेथील पोटनिवडणूक राजकीयदृष्ट्या अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील (ईव्हीएम) बिघाडामुळे भंडारा-गोंदिया मतदारसंघातील 49 केंद्रांवर आज फेरमतदान घेण्यात आले. तिथे अंदाजे 45 टक्के मतदान झाल्याचे समजते. उत्तरप्रदेशच्या कैराना लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालाकडेही संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

याआधी उत्तरप्रदेशच्या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सत्तारूढ भाजपला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या आधीच्या पोटनिवडणुकीतील अपयश भाजप धुवून काढणार की त्या पक्षाच्या पराभवाची हॅट्ट्रिक होणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. देशातील लोकसभेच्या चार आणि विधानसभांच्या नऊ जागांसाठीच्या पोटनिवडणुकांच्या निकालाचा परिणाम राजकीय पक्षांच्या पुढील वाटचालीवर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उद्याचा निकाल राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा बनण्याची चिन्हे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)