भाजप आणि कॉंग्रेस ‘सापनाथ-नागनाथ’ : मायावती 

छत्तीसगडमध्ये विरोधात बसू 

रायपुर – भाजप आणि कॉंग्रेस आमच्यासाठी एक सापनाथ आणि दुसरा नागनाथ आहे या आपल्या जुन्या विधानाची पुनरूक्ती करताना बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी छत्तीसगडमध्ये सरकार स्थापनेसाठी यापैकी कोणत्याही पक्षाशी आघाडी केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्यापैकी कोणाशीही आघाडी करण्याऐवजी आम्ही विरोधात बसणे पसंत करू असे त्यांनी म्हटले आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

-Ads-

बहुजन समाज पक्षाने छत्तीसगड मध्ये अजित जोगी यांच्या पक्षाशी आघाडी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की आमच्या आघाडीला राज्यात बहुमत मिळेल. आम्हाला कोणाची मदत घेण्याची वेळ येणार नाहीं आणि आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही. मायावती यांच्या भूमिकेविषयी अजित जोगी यांना विचारले असता ते म्हणाले की या विषयावर आमची अद्याप चर्चा झालेली नाही.

मायावती यांची अन्य पक्षांविषयीची जी भूमिका आहे त्याविषयी मी केवळ वृत्तपत्रांमध्ये वाचले आहे. सध्या आम्ही राज्यात एकत्र असून येथे एकत्रपणे निवडणूक िंजंकण्याच्या कामी व्यस्त आहोत. निवडणुकीनंतरच्या समिकरणाबाबत आम्ही नंतर चर्चा करून भूमिका ठरवू असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)