भाजपा 2019 आधी बाबासाहेब आंबेडकर ‘रामभक्त’ होते असंही म्हणेल

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘रामभक्त’ होते असे 2019 च्या निवडणुकीआधी भाजपा जाहीर करू शकते, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव डॉ.भीमराव अंबेडकर नाही तर ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर’ असे पूर्ण नाव वापरले पाहिजे, असा शासनादेश उत्तर प्रदेश सरकारने जारी केला. उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयावरून प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे भाऊ आनंदराज आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली आहे. भाजपाला 2019 च्या आधी त्यांचा अजेंडा निश्चित करायचा आहे. त्यामुळे हे सगळं फक्त मतांसाठी चाललं आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दलितांची मते मिळवण्यासाठी भाजपा सरकारने केलेली ही खेळी आहे अशी टीका आनंदराज आंबेडकर यांनी केली. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव लिहिण्याचा आदेश आत्ताच का दिला? राम मंदिर प्रश्नावर अपयश आल्यानेच बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)