भाजपा – शिवसेना सरकारला घालवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही : धनंजय मुंडे 

कोल्हापूर: भुदगरड तालुक्यातील मुदोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवर्तन यात्रेची सभा आज झाली. सभेया वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तीन-चार तासांपासून चर्चा सुरू आहे की, धनंजय मुंडे यांचं हेलिकॉप्टर भरकटले आहे. ही बातमी ऐकून विरोधकांना गुदगुल्या होत होत्या. पण लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा खणखणीत इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या सभेत दिला.

आज देशात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. चोर चौकीदाराच्याच मागे बसून त्याची भाषणे ऐकत आहेत आणि चौकीदार म्हणताहेत की सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. ज्या माणसाने कधी खेळण्यातील विमानही बनवले नाही, अशा माणसाला राफेल विमान बनवण्याचे काम दिले. हा भ्रष्टाचार नाही का, असा सवालही त्यांनी केला.

-Ads-

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)