भाजपा व आरएसएसचे लक्ष प्रथमच मतदान करणाऱ्या युवावर्गावर केंद्रीत

नवी दिल्ली -भाजपा व आरएसएसने आपले लक्ष प्रथमच मतदान करणाऱ्या युवावर्गावर केंद्रीत केलेले आहे. लोकसभा निवडणुका पुढील वर्षे होणार असल्या, तरी त्याची तयारी राजकीय पक्षांनी आतापासूनच सुरू केलेली आहे. आपल्या परंपरागत मतदारांबरोबरच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले लक्ष 2019 मध्ये प्रथमच मतदानाचा अधिकार मिळणाऱ्या युवावर्गावर केंद्रीत केले आहे.

2019 साली वयाची 18 वर्षे पूर्ण करून प्रथमच मतदान करणारांची संख्या सुमारे 1.8 कोटी आहे. या युवा मतदारांची भूमिका फार महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी भाजपा आणि आरएसएसचा जोरदार प्रयत्न चालू आहे आणि त्यासाठी कॉलेज परिसरांमध्ये त्यांचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. आरएसएसची युवा शाखा अभाविप (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) ने त्यासाठी बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशासह दक्षिण भारतातील राज्यांमध्येही व्यापक प्रमाणावर अभियान सुरू केले आहे. त्या दृष्टीने अभाविपने पाटणा, भागलपूर आणि मुजफ्फरपूर विद्यापीठांच्या निवडणुकांमध्ये 25 वर्षांनंतर मिळवलेले यश महत्त्वपूर्ण आहे.

-Ads-

1.8 कोटी नवीन मतदारांना आकृष्ट करून घेण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सूचना दिलेल्या आहेत. गेल्या तीन वर्षात विद्यार्थ्यांना आरएसएसच्या विचारधारेशी जोडून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभियान चालविण्यात येत आहे. आरएसएसने पूर्वोत्तर भारतातील आदिवासी युवकांसाठी अनेक शैक्षणिक आणि क्रीडा कार्यक्रम सुरू केलेले आहेत. अलीकडेच  निवडणुका झालेल्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅंड राज्यांमध्ये हीच रणनीती वापरल्याचे भाजपाच्या एका वरिष्ट नेत्याने सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)