भाजपा धर्माच्या नावाखाली आरक्षण देणार नाही, देऊ देणार नाही : अमित शाह 

नवी दिल्ली: धर्माच्या नावाखाली भाजपा आरक्षण देणार नाही आणि कोणाला देऊ देणार नाही असे भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी वारंग जिल्ह्यातील पार्कला येथील एका निवडणूक रॅलीत सांगितले. तेलंगणा विधानसभेने मुस्लिमांना धर्माच्या नावाखाली शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 12 टक्के आरक्षण देण्याचा ठराव मांडला आहे, त्यासंदर्भात ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्‍क्‍याची सीमा निश्‍चित केलेली असताना मुस्लिमांसाठीचे आरक्षण 4 टक्‍क्‍यांवरून वाढवून 12 टक्के करताना टीआरएसचे अध्यक्ष केसीआर कोणाचे आरक्षण कमी करणार आहेत? असा प्रश्‍न विचारून या भाजपा मंजुरी देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. आणि मागासवर्गाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी भाजपा पहाडाप्रमाणे उभी राहील, असे सांगून अमित शहा म्हणाले, तेलंगणात एमआयएम (मजसिल ए इत्तेहादूल मुस्लिमिन) आणि त्यांचे नेते असदुद्दीन ओवेसीवर विसंबून न राहता केवळ भाजपाच सरकार देऊ शकते. आपला मुलगा आणि मुलगी यांना पुढे आणण्यासाठी टीआरएस प्रमुख केसीआर यांनी विधासभेच्या मुदतपूर्व निवडणुकांचा ा निर्णय धेऊन निवडणूक खर्चाचा अतिरिक्त बोझा टाकला आहे, अशी टीका त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)