भाजपा ‘ट्रॅव्हल एजेन्सी’ कर्जबुडव्यांना परदेशात पळायला मदत करते : काँग्रेस 

नवी दिल्ली: कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या ‘आपण भारत सोडायच्या आधी अरुण जेटलींची भेट घेतली होती’ या दाव्यावरून विरोधकांनी भाजपाला चांगलेच धारेवर धरले आहे. अशातच काँग्रेसने आज याबाबत आणखीन एक खळबळजनक दावा केला आहे. “भाजपा सरकारच्या कालावधीमध्ये आतपर्यंत २३ कर्जबुडव्यांनी देशाला तब्बल ९०,००० करोड रुपयांचा चुना लावत पलायन केले आहे.” असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते जयवीर शेरगील यांनी केला.
शेरगील यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपा सरकारच्या नावाने आरोपांचा पाढा वाचला. ते म्हणाले, “भाजपा सरकारच्या काळात निरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या इत्यादी घोटाळेखोरांनी देशातून पलायन केले. एवढे मोठे घोटाळे करून देखील हे लोक देश सोडून पळून जाण्यात कश्या प्रकारे यशस्वी झाले, यांच्यामागे ‘राजकीय वरदहस्त’ आहे की काय? असे प्रश्न निर्माण होतात” त्यांनी पुढे बोलताना “हे सरकार कॉमन मॅनचे नसून कॉन-मॅनचे (घोटाळेबाजांचे) आहे. सरकार एखाद्या ट्रॅव्हल एजेन्सी प्रमाणे कर्जबुडव्यांना परदेशात पलायन करायला मदत करत आहे.” असा गंभीर आरोप देखील केला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)