जयपूर: राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच भाजपाला आज दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपाचे राजस्थानातील खासदार आणि माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेल्या हरिशचंद्र मीना यांनी आज राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मीना यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भाजपाला मोठा धक्का बसला असल्याच्या चर्चा सुरु असतानाच भाजपाला लगेच पुन्हा दुसरा धक्क बसला. नागौरचे भाजप आमदार हबीबुर रहमान यांनीही भाजपला रामराम ठोकत कॉंग्रेस मध्ये आपली घरवापसी केली. सुमारे दशकभरानंतर ते पुन्हा कॉंग्रेस मध्ये परतले आहेत. जयपुर मध्ये कॉंग्रेस नेते रघु शर्मा यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. रहमान हे दहा वर्षापुर्वी पर्यंत कॉंग्रेस मध्ये होते.
सन 2001 ते 2003 या काळात कॉंग्रेसच्या गेहलोत मंत्रिमंडळात ते राज्यमंत्रीही होते. पण त्यांना पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर ते 2008 मध्ये भाजप मध्ये गेले. 2008 व 2013 या दोन विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर विजयी झाले होते. यावेळच्या निवडणुकीत भाजपने त्यांची उमेदवारी नाकारून मोहन राम चौधरी यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपण विनाशर्थ कॉंग्रेस मध्ये आलो आहोत असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा