भाजपा कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष

कराड, दि. 29 (प्रतिनिधी) – मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाला एकमताने मंजूरी मिळाल्याने भारतीय जनता पार्टीच्या कराड दक्षिणमधील कार्यकर्त्यांनी ढेबेवाडी फाट्यावरील पक्षाच्या विभागीय कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला. यावेळी फटाक्‍यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी नागरिकांना साखर-पेढ्यांचे वाटप केले.
मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे, अशी मागणी मराठा समाजाकडून सातत्याने होत होती. यासाठी लाखो समाजबांधवांचे भव्य मोर्चेही काढण्यात आले होते. मराठा समाजाच्या या मागणीला प्रथमपासून भाजपाने पाठिंबा दिला होता. इतकेच नव्हे तर भाजपच हे आरक्षण मिळवून देऊ शकेल, याची खात्री पहिल्यापासूनच मराठा समाजाला होती. दरम्यान, आज मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाची तरतूद असणारे विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात मांडले असता ते एकमताने मंजूर झाले. भाजप सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये 16 टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ढेबेवाडी फाट्यावरील कराड दक्षिण विभागीय कार्यालयासमोर एकत्र येत जल्लोष साजरा केला. यावेळी नागरिकांना साखर-पेढ्यांचे वाटप केले. यावेळी भाजपा सरकारच्या विजयाच्या तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व ना. डॉ. अतुल भोसले यांच्या विजयाच्या घोषणाही देण्यात आल्या.
याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, शेतीमित्र अशोकराव थोरात, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, मलकापूरचे माजी विरोधी पक्षनेते हणमंतराव जाधव, माजी नगराध्यक्ष आबासो गावडे, भाजपा शहराध्यक्ष सूरज शेवाळे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, अनसुचित जाती-जमाती आघाडीचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सातपुते, कराडचे माजी विरोधी पक्षनेते महादेव पवार, तानाजी देशमुख, धनाजी माने, पिनू जाधव, सुरेश खिलारे, संतोष हिंगसे, जमिश शेख, अरुण यादव, अर्जुन जगदाळे, वसीम मुल्ला, सुरेश चौगले, पोपटराव देसाई, गफार नदाफ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)