भाजपा कार्यकर्ता मेळाव्यास क्रीडांगणावर परवानगी देऊ नये -सचिन काळभोर

पिंपरी- भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहरचा निगडी येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर 3 नोव्हेंबरला कार्यकर्ता मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे. मात्र,राजकीय पक्षांना कार्यक्रम घेण्यास बंदी ठराव असल्याने मेळ्याव्यास परिवानगी देऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना केली आहे. सुटी असल्याने विद्यार्थी मदनलाल धिंग्रा मैदानात खेळाचा सराव करण्यासाठी येतात. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामुळे क्रीडा प्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कार्यक्रमात येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या अंदाजे एक लाखापर्यंत असून त्यांच्या वाहनाच्या पार्कींगची व्यवस्था नसल्याने आजूबाजूच्या परिसरातील लोकांना तसेच जेष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागेल, याची प्रशासनाने दखल घेऊन हा कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी घेण्याची मागणी निवेदनात केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)