भाजपा आमदार डॉ. आशिष देशमुख यांचा राजीनामा 

मुंबई: खासदार नाना पटोले यांच्या पावलावर पाउल ठेवत काटोल मतदारसंघातील नाराज भाजपा आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी अखेर भाजपाला रामराम ठोकला आहे. आशिष देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा पाठविला असून बुधवारी ते विधानसभाध्यक्षांना प्रत्यक्ष भेटून आपला राजीनामा सादर करणार आहेत. नाराज आशिष देशमुख यांची पावले कॉंग्रेसकडे वळल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
मी 2 ऑक्‍टोबर 2018 दुपार पासून माझ्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी या दोन ओळीच्या पत्रात म्हटले आहे. काटोल विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार डॉ. आशिष देशमुख हे गेल्या काही महिन्यांपासून नाराजच होते. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीवरून त्यांनी आधीही राजीनाम्याचा इशारा दिला होता.
आता देखील विदर्भातील शेतकरी आणि तरूण हे अतिशय हलाखीच्या अवस्थेत असून सरकार त्यांना दिलासा देण्यासाठी काहीही करत नसल्याने आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यातील आपली पुढची राजकीय वाटचाल ही कॉंग्रेसच्याच दिशेने असणार असल्याचे स्पष्ट संकेतही डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)