भाजपा आमदाराने ममता बॅनर्जींची तुलना शूर्पणखाशी केली

नवी दिल्ली : वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असणारे उत्तर प्रदेश भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलेआहे. यावेळी त्यांनी थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. ममता बॅनर्जींची तुलना शूर्पणखाशी तर काँग्रेसची तुलना रावणाशी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नसून लवकरच पश्चिम बंगाल जम्मू-काश्मीरप्रमाणे बनेल असे सुरेंद्र सिंह यांनी म्हटले. जिल्हा पंचायत कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपा सरकार असलेल्या राज्यांमधून सर्व दहशतवादी पळून बंगालला गेले आहेत, अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस बंगाल जम्मू-काश्मीर बनेल. ममता बॅनर्जी या शूर्पणखा आहेत आणि त्यांचे नाक कापायला लक्ष्मणाने जन्म घेतला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह मिळून शूर्पणखाचे नाक कापतील असे वादग्रस्त विधान सुरेंद्र सिंह यांनी केले. तसेच काँग्रेस रावणाच्या भूमिकेत आहेत, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)