भाजपाला निवडणुकीपूर्वी झटका ? ‘या’ जुन्या मित्रपक्षाने दिला अल्टीमेट

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला जोरदार झटका बसण्याची चिन्ह दिसत आहेत. एनडीएमधील महत्वाचे सहयोगी पक्ष शिरोमणि अकाली दल आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

भाजपचा सर्वात जुना सहयोगी पक्ष अकाली दलने गुरुद्वारा प्रकरणात हस्तक्षेपावरून भाजपाला अल्टीमेट दिला आहे. भाजपने जर गुरुद्वारा प्रकरणात हस्तक्षेप बंद केला नाही तर आघाडी आमच्यासाठी काही महत्वाची राहणार नाही, असे त्यांनी बजावले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिरोमणि अकाली दलचे महासचिव मनजिंदर सिंह सिरसा म्हणाले, आमच्यासाठी आघाडी महत्वाची नसून,आमचे खासदार, आमदार बनावे असे सुद्धा आम्हाला वाटत नाही. आमच्यासाठी आमच्या गुरूंचे घर महत्वाचे आहे. जर भाजपने गुरुद्वारा प्रकरणात हस्तक्षेप बंद केला नाही तर आम्ही कोणत्याही निर्णयापर्यंत जाऊ.

काय आहे प्रकरण ?

शीख धर्मामध्ये ५ तख्त मानले गेले आहेत. ५ पैकी ३ श्री अकाल तख्त साहिब, श्री केशगढ़ साहिब आणि श्री दमदमा साहिब पंजाबमध्ये आहेत. बिहारमध्ये श्री पटना साहिब आणि महाराष्ट्र नांदेड़ मध्ये श्री हज़ूर साहिब.  शिरोमणि अकाली दलाने म्हटले की, भाजप यावर हक्क प्रस्थापित करत आहे. बिहार मध्ये पटना साहिब तख्त वर भाजपने हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र अकाली दलचे वरिष्ठ नेता सुखबीर बादल यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी बोलून प्रकरण मिटवले.

मात्र, शिरोमणि अकाली दलने म्हटले , महाराष्ट्रातील भाजप सरकार नांदेडचे ‘श्री हजूर साहिब तख्त’ यावर हक्क प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी निवडून आलेले नाही तर नियुक्त केलेल्या लोकांना तख्तचे प्रमुख बनवल्या जात आहे. महाराष्ट्र सरकारने यापूर्वी एका आमदाराला हज़ूर साहिब तख्तचे प्रमुख केले होते. आता कायद्यात बदल करून महाराष्ट्र सरकार तख्तचे प्रमुख नियुक्त करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)