भाजपाला देश चालवण्याचा अनुभव नाही – गुलाम नबी आझाद

गोंदा (उत्तर प्रदेश) – भाजपाला देश चालवण्याचा अनुभव नाही, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. गोंदा येथे पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी केंद्रीय मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेपक्षा संसदेच्या बाहेरच जास्त बोलताना दिसतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत फार क्वचित बोलतात. मात्र संसदेबाहेर बोलण्याचा त्यांना कधीही कंटाळा येत नाही, असा टोला आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला, जीएसटी (गुड्‌स अँड सर्व्हिस टॅक्‍स) लागू केल्यामुळे लाखो छोटे आणि मध्यम उद्योग बंद पडले. त्या उद्योग व्यवसायांमध्ये काम करणारे कामगार बेकार झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे नोटाबंदीमुळे देशभरात सुमारे 35 लाख लोकांची रोजीरोटी गेल्याचा त्यांनी दावा केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवडणुका जवळ आल्या की भाजपाला राम मंदिराची आठवण येते आणि एकदा निवडणुका पार पडल्या की राम मंदिराचा मुद्दा भाजपा विसरून जातो, असे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी या प्रसंगी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)