भाजपाचा बिमोड करण्यासाठी पवार वापरणार ‘२००४’चा फॉर्मुला

नवी दिल्ली: माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची आज राजधानी दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीनंतर तिन्ही नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद देखील संबोधित केली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी “देशभरातील भाजपा विरोधी पक्षांना ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ अंतर्गत एका छत्राखाली आणण्याचा आपला इरादा असल्याचे” स्पष्ट केले.

नायडूंवर काँग्रेससह प्रादेशिक पक्षांना जोडण्याची जबाबदारी     
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पवार यांनी चंद्रबाबू नायडू यांच्यावर इतर राज्यांतील भाजपा विरोधी पक्षांना महाआघाडीमध्ये जोडण्याची जबाबदारी असून त्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याची माहिती देखील दिली. काही दिवसांपूर्वी पवार व नायडू यांनी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेस व इतर प्रादेशिक पक्षांमध्ये उडालेल्या शाब्दिक चकमकींमुळे महायुतीच्या शक्यतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते मात्र आजच्या पत्रकार परिषदेनंतर ते काहीप्रमाणात दूर झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काय आहे ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’?                                                                    पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ अंतर्गत सर्व विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा इरादा स्पष्ट केला. २००४ मध्ये काँग्रेसद्वारे याच ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ अंतर्गत समवैचारिक पक्षांची आघाडी असलेले युपीएचे सरकार स्थापन करण्यात आले होते. एका विचाराने प्रेरित सरकारची स्थापना हे ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’चे उद्दिष्ट्य असते.

सरकारी संस्था आणि लोकशाही वाचवण्यासाठी देणार हाक
शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सरकारचा सीबीआय, आरबीआय या संस्थांमधील वाढत्या हस्तक्षेपाबाबत चिंता व्यक्त करत लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)