भाजपाकडून राज्यघटनेवरच हल्ला

राहुल गांधी यांची टीका

चमराजनगर – भाजपाकडून राज्यघटनेवरच हल्ला केला जात आहे, अशी टीका कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच असून त्यामध्ये बदल करण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्याचा इशाराही दिला आहे. म्हैसूर येथील चामुंडेश्‍वरी देवीचे दर्शन घेतल्यानंतरच्या सभेमध्ये ते बोलत होते. भाजपाने नोटबंदी आणि जीएसटीतून लोकांचे पैसेच हिसकावले नाहीत, तर राज्यघटनेवरच हल्ला करण्याची नवीन फॅशनही येऊ घातली आहे, असे ते म्हणाले.

राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा जेवढा प्रयत्न भाजपाकडून केला जाईल, तेवढाच जोर लावून डॉ. आंबेडकर यांचे योगदान असलेली राज्यघटना सुरक्षित राखण्यासाठी कॉंग्रेसही प्रयत्नशील असेल, असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोजगार आणि नोटबंदीमुळे निर्माण झालेल्या प्रश्‍नांबाबत असंवेदनशील असल्याचा आरोपही त्यांनी केला. कर्नाटकातील तरुणांकडे रोजगार नाही. नोटबंदीमुळे कोणालाही फायदा झालेला नाही. “जीएसटी’ मधील करांचे पाच टप्पे नागरिकांच्या फायद्याचे नाहीत. नोटबंदीनंतरच्या काळात बहुतेकांनी आपला काळा पैसा बॅंकांमध्ये जमा केला आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

आगामी काळात विधानसभेच्या निवडणूका होत असलेल्या कर्नाटकमधील प्रचाराच्या दोन दिवसांच्या चौथ्या टप्प्यामध्ये राहुल गांधी मंड्या, म्हैसूर आणि चमरजनगर जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. यापूर्वीच्या प्रचार दौऱ्यात त्यांनी उत्तर, किनारपट्टी आणि मालनाद भागांचा दौरा केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)