भाजपसोबत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची फिक्‍सिंग

ऍड.प्रकाश आंबेडकरः भाजप विरोधात लाट निर्माण करणार
सातारा,दि.28 प्रतिनिधी- भाजपच्या विरोधात कॉंग्रेस अन राष्ट्रवादी लढूच शकत नाही. त्यांचा भाजपच्या विरोधातील एक तरी यशस्वी लढा दाखवून द्या. तुरूंगात जाण्याच्या भितीने त्यांची संसदेत भाजपसोबत मिली-जुली आहे. उद्याच असाच प्रकार बाहेर ही घडू शकतो. म्हणूनच वंचित बहुजन विकास आघाडीची स्थापना केली असून त्यामाध्यमातून वंचित घटकांना संसदेत पाठविण्यासाठी भाजपच्या विरोधात लाट निर्माण करणार असल्याचे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी चंद्रकांत खंडाईत, गणेश भिसे, संदीप कांबळे, सिध्दार्थ खरात आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ऍड.आंबेडकर म्हणाले,आजपर्यंत पुरोगामी म्हणणाऱ्या पक्षांच्या घराणेशाहीच्या राजकारणामुळे ज्यांना प्रतिनिधीत्व मिळाले नाही तसेच कायम सत्तेपासून दूर राहिलेल्या समुहाला संसदेत पाठविण्यासाठी आघाडीची स्थापना केली आहे. आघाडीच्या माध्यमातून धनगर, माळी, मुस्लिम, अति मागासवर्गीय, ओबीसी आदी.प्रवर्गातील व्यक्तींना लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. निवडणूकीव्दारे लोक शाहीचे सामाजिकरण व सत्तेचे खऱ्या अर्थाने विकेंद्रीकरण केले जाणार आहे. यंदाच्या निवडणूकांमध्ये प्रश्न इतके आहेत की भाजप पैशाच्या जोरावर निवडणूका जिंकू शकणार नाहीत. या निवडणूकांमध्ये वंचित घटकांची लाट काय असते दाखवून देणार आहे. निवडणूका आता काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या असताना भाजपकडून आणीबाणी व पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका असल्याचे मुद्दे उपस्थित करत आहेत. आणीबाणीच्या काळात तत्कालिन सरंसघचालकांनी इंदिरा गांधी यांना काय पत्र लिहीले होते हे संघाने व भाजपने जाहीर केले पाहिजे. तसेच पंतप्रधान मोदींना सात पदरी कवचसुरक्षा दिली जाते. त्यांना मिळणाऱ्या धमक्‍या पाहता आता चौदा पदरी सुरक्षा देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. तसेच पंतप्रधानांच्या जीवाला धोका असेल तर देशाचा पंतप्रधान बदलण्यात यावा व मोदींचा जीव सुरक्षित करावा, असा टोला ऍड. आंबेडकर यांनी लगावत मोदींना आत्तापर्यंत आलेल्या धमक्‍यांचा तपास जनतेसमोर जाहीर के ला पाहिजे अशी देखील मागणी त्यांनी केली. वास्तविक भाजपने नागरिकांच्या खात्यावर 15 लाख, काळा पैसा परत आणणार आदी. आश्वासने ते पुर्ण करू शकले नाहीत. तसेच राफेल विमानांच्या खरेदीबाबत ज्या पध्दतीने जाहीरपणे जनतेला माहिती दिली होती तशी माहिती भाजप देत नाही. उलट मोदींच्या जीवाला धोका हे सांगून जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु आम्ही हे होवू देणार नाही. तसेच आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांची निवड ही युपीएससी माध्यमातून होणे बंधनकारक असताना त्या परिक्षा न देता अधिकारी होण्याची सुविधा सरकारने उपलब्ध केली आहे. हा प्रकार म्हणजे संविधान बदलण्याचा प्रकार असून सरकारला घटना तो अधिकार देत नाही असे ऍड.आंबेडकर यांनी शेवटी सांगितले.
चौकटः
धनगर समाजाला सत्तेत आणणार
धनगर आरक्षणाच्या मुद्दयावर ऍड.प्रकाश आंबेडकर म्हणाले, धनगर समाजाला सत्तेत आणण्याचे काम आम्ही करणार आहोत. पुढे आरक्षण प्राप्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी हवी ती मदत आम्ही करू तसेच आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लागता धनगर समाजाला आरक्षण मिळू शकते असे ऍड.आंबेडकर यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)