भाजपशी युती तोडल्यास शिवसेनेचे नुकसान होईल – आठवले

जालना – भाजपशी युती तोडल्यास शिवसेनेचेच नुकसान होईल. त्यामुळे शिवसेनेने युती तोडू नये, असे आवाहन आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. दोन्ही पक्षांमधील युती कायम रहावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलेन, असे आठवले येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आमच्या पक्षाची (रिपाइं-आठवले गट) भाजपबरोबरची हातमिळवणी कायम राहील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

शिवसेनेबरोबरचा तणाव कमी करण्याच्या उद्देशाने भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी अलिकडेच मुंबईत उद्धव यांची भेट घेतली. मात्र, त्यानंतरही स्वबळावर लढण्याची भूमिका शिवसेनेने कायम ठेवली आहे. यापार्श्‍वभूमीवर, आठवले यांनी त्यांची भूमिका मांडली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)