भाजपशीही आघाडी नाही ; तेलंगणात स्वबळावरच लढणार – चंद्रशेखर राव

हैदराबाद – तेलंगणा विधानसभा बरखास्त केल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करणारे तेलंगणा राष्ट्रीय समिती या पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी आपण भाजपशीही हातमिळवणी करणार नसल्याचे स्पष्ट केले असून राज्यात आपण स्वबळावरच निवडणूक लढवणार आहोत असे म्हटले आहे.

राज्यातल्या सर्व 119 जागा आपण स्वबळावर लढणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान चंद्रशेखर राव यांच्या विधानावर प्रतिक्रीया देताना भाजपने म्हटले आहे की यातून तुमचेच नुकसान होणार आहे आमचे नाही. त्यांच्या या निर्णयाने आम्हाला काहीही फरक पडत नाही असेही भाजपच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

चंद्रशेखर राव यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करणारे विधान केल्यानंतर ते भाजपशी जवळीक साधून असावेत असा कयास व्यक्त केला गेला होता पण त्याचे त्यांनीच निराकरण केले आहे. आम्ही शंभर टक्के सेक्‍युलर असून सेक्‍युलरच राहणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)