भाजपविरोधात रान पेटवणार!

संग्राम कोते पाटील : राष्ट्रवादीकडे युवकांचा कल
पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्यात अहमदनगर, लातूर, औरंगाबाद, जळगाव, आदी ठिकाणी युवक मेळावे घेतले असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे युवकांचा कल अधिक आहे. लाखो विद्यार्थ्यांना सोबत घेवून सरकारच्या विरोधात 40 ते 45 मोर्चे, आंदोलने केली आहेत. या सरकारने खोटी आश्‍वासने देवून जनतेला फसवले आहे. भाजपचे सरकार अधिक काळ टिकणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी केली.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित युवक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघरे, ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, नगरसेवक भाउसाहेब भोईर, मंगला कदम, अपर्णा डोके, मयूर कलाटे, फजल शेख, मोहंमद पानसरे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कोते पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कोते-पाटील म्हणाले की, मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाबाबत भारतीय जनता पक्षाने कोणतेही ठोस निर्णय घेतले नाहीत. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासनेही पाळली नाहीत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यभरात 30 युवक मेळाव्यांचे आयोजन केले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 100 परिवर्तन रॅलीचे आयोजन केले आहे. युवक कार्यकर्त्यांनी भाजपने केलेली फसवणूक समाजाला सांगावी. समाजातील समस्यांसाठी एकत्रित येवून रस्त्यावरची लढाई करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)