भाजपविरोधात कॉंग्रेसचा “जनसंघर्ष’

File photo

पिंपरी – भाजपविरोधात कॉंग्रेसने काढलेली “जनसंघर्ष यात्रा’ येत्या 7 सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड शहरात येणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी रविवारी (दि. 2) पत्रकार परिषदेत दिली.

यानिमित्त नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले सभागृहात सायंकाळी पाच वाजता सभा होणार आहे. या वेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार मल्लीकार्जुन खर्गे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव आशिष दुवा, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम आदी उपस्थित राहणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सचिन साठे म्हणाले की, भाजपच्या कार्यकालात जातीय सलोखा राहिला नाही. नोटाबंदीच्या चुकीच्या निर्णयामुळे नागरिकांचा होता तो रोजगार हिरावून घेतला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन या सरकारला पूर्ण करता आले नाही, याचा जाब विचारण्यासाठी ही जनसंघर्ष यात्रा होत आहे.

साठे म्हणाले, “”सत्तेचे दबावतंत्र वापरून पिंपरी-चिंचवड प्राधिकरण पीएमआरडीएमध्ये विलीन करण्याचा कुटील डाव पालकमंत्र्यांनी आखला होता. याला सर्वप्रथम कॉंग्रेसने विरोध केला होता. प्राधिकरणाच्या ताब्यात असणाऱ्या भूमिपुत्रांच्या जमिनी, प्राधिकरणाच्या ठेवी व मालमत्ता गिळंकृत करण्याचा शासनाचा डाव होता. मात्र, हा डाव विरोधामुळे धुळीस मिळाला”. काही महामंडळांवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती स्विकारल्याबाबत प्रश्न विचारला असता, “”शिवसेनेने राजीनामा या शब्दाचे महत्त्वच कमी केले आहे. त्यामुळे शिवसेनेवरील नागरिकांचा विश्वासच उडाला आहे”, असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)