भाजपविरोधात एकवटल्या विरोधी पक्षांच्या युवक शाखा

नवी दिल्ली – पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी संघर्ष करण्यासाठी एकत्र येण्याच्या उद्देशातून विरोधी पक्षांच्या हालचाली सुरू आहेत. अशातच विरोधी पक्षांच्या युवक शाखा भाजपविरोधात एकवटल्या आहेत. त्यांची प्राथमिक बैठक येथे झाली. या बैठकीला भारतीय युवक कॉंग्रेस, डेमोक्रॅटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, ऑल इंडिया युथ फेडरेशन, ऑल इंडिया युथ लीग, आययूएमएल युथ लीग यांच्याबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या युवक शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राष्ट्रीय आणि राज्यांच्या स्तरांवर युवकांशी निगडीत समस्या मांडण्यासाठी संयुक्त आंदोलने छेडण्याचा निर्णय विरोधी पक्षांच्या युवक शाखांनी घेतला आहे. पुढील रणनीती आणि कार्यक्रम निश्‍चित करण्यासाठी 3 सप्टेंबरला युवक शाखांची व्यापक बैठक आयोजित केली जाणार आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)