भाजपवर महापालिका प्रशासन मेहेरबान

पिंपरी – राष्ट्रवादीच्या हल्लाबोल कार्यक्रमाचे पिंपळे गुरव येथील फ्लेक्‍स बेकायदेशीर ठरवत ते कार्यक्रमापूर्वीच तत्काळ काढून टाकण्याची तत्परता महापालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी दाखविली होती. मात्र, उपमहापौर सचिन चिंचवडे यांचे वाढदिवसानिमित्तचे बहुतांशी अनधिकृत फ्लेक्‍स चार दिवसांपासून शहरभर झळकत आहेत. त्यांच्याकडे मात्र, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. हे फ्लेक्‍स अनधिकृत असल्यास, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांना दिली.

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचे पिंपळे गुरव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे फ्लेक्‍स लावण्यात आले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, त्याच दिवशी सकाळी हे सर्व फ्लेक्‍स अनधिकृत असल्याचा दावा करत, हे फ्लेक्‍स हटविण्यात आले होते. तर हे सर्व फ्लेक्‍स अधिकृत असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला होता. दरम्यान, याप्रकरणात आमदार लक्षमण जगताप यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले होते. या कारवाईमुळे महापालिकेच्या तत्परतेची देखील चांगलीच चर्चा रंगली होती. या पार्श्‍वभूमीवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारले असता, उपमहापौर सचिन चिंचवडे यांचे शहरातील फ्लेक्‍स अनधिकृत असल्याची बाब मला माहित नाही. मात्र, हे फ्लेक्‍स अनधिकृत असल्यास, ते तत्काळ हटविण्याची ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

-Ads-

पुण्यातील अनधिकृत होर्डिंग कोसळून, चार जणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर महापौर राहुल जाधव यांनी शहरातील सर्व अनधिकृत होर्डींग्ज हटविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व फ्लेक्‍सची आकडेवारी आकाशचिन्ह व परवाना विभागाला संकलीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिकेचे फ्लेक्‍स धोरण लवकरच
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील बहुतांशी फ्लेक्‍स अनधिकृत आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यावर उपाय म्हणून फ्लेक्‍स व होर्डिंगबाबतचे नवे जाहिरात धोरण महापालिका आणणार आहे. त्यानुसार शहरातील फ्लेक्‍सला मंजुरी, त्यांचा आकारमान, दोन फ्लेक्‍समधील अंतर, नियंत्रण या सर्व बाबींचा समावेश असणार आहे. त्यामुळे शहरातील अनधिकृत फ्लेक्‍सच्या संख्येला चाप बसणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)