भाजपला 2014 ची पुनरावृत्ती करता येणे आता अशक्‍य – ममता बॅनर्जी

कोलकाता – भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारने केवळ मुजोरीचा कारभार चालवला आहे. त्यांना सर्वच क्षेत्रात अपयश आले असून त्यांचा सन 2019 मध्ये पराभव निश्‍चीत आहे. सन 2014 मधील निवडणुकांमध्ये त्यांनी जी कामगीरी केली होती त्याची पुनरावृत्त करणे त्यांता आता केवळ अशक्‍य आहे असे तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

एका बंगाली वाहिनीने आयोजित केलेल्या चर्चेत बोलताना त्या म्हणाल्या की भाजपने देशात पहिल्यादांच गनिमी हिंदुत्व आणले. त्यांनी अनेक ठिकाणी लोकांना ठेचून मारण्याचे प्रयोग केले. सन 2014 च्या निवडणुकीत लोकांना खोटी स्वप्ने दाखवून त्यांनी भुलवले. त्यावेळी 31 टक्के मतदारांनी त्यांना मतदान केले त्यात भाजपला स्वबळावर 283 जागा मिळाल्या. पण त्यांची सर्वच आश्‍वासने फोल ठरली असून त्यांना आता 2014 इतके यश मिळणे केवळ अशक्‍य आहे. 2019 च्या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष महत्वाची भूमिका बजावतील असे त्या म्हणाल्या.

भाजपला पराभूत केल्यानंतर विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हा प्रश्‍न सातत्याने विचारला जातो पण त्याला याही वेळी ममतांनी ठोस उत्तर देण्याचे टाळले. त्या म्हणाल्या की 2019 च्या निवडणूक निकालानंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवला जाईल. यावेळी लोक भाजपला ठामपणे नाही म्हणतील आणि ते भाजपला पर्यायी सरकार निवडून देतील. सत्ताबदल करण्याबाबत आता लोक अजिबात साशंक राहिलेले नाहींत असे मतही त्यांनी व्यक्‍त केले.

देशात प्रादेशिक पक्ष आता मजबूत होत असून त्यांच्यातच एक परिवार म्हणून काम करण्याची भावना वाढीला लागली आहे असे मतही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)