भाजपला मतदान करणारे बसपा आमदार निलंबित

भाजपाकडून घोडेबाजार झाल्याचा मायावतींचा आरोप

नवी दिल्ली – राज्यसभेच्या निवडणूकीदरम्यान भाजपाच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, असे बसपा प्रमुख मायावती यांनी शनिवारी सांगितले. अनिल सिंह असे निलंबित करण्यात आलेल्या बसपा आमदाराचे नाव असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीबरोबर बहुजन समाज पार्टीने राज्यसभेच्या निवडणूकीसाठी समझोता केला होता. हा समझोता तोडण्याचा प्रयत्न भाजपाने केला आणि दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप मायावती यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र तरिही शुक्रवारी झालेल्या राज्यसभेच्या निवडणूकांमुळे सपा आणि बसपाच्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

उत्तर प्रदेशातील भाजपाचे सरकार शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून नागरिकांमध्ये दहशत आणि भीती पसरवत आहे. या भीतीच्या वातावरणामुळेच राज्यसभेच्या निवडणूकीमध्ये “क्रॉस व्होटिंग’ झाल्याचे मायावती म्हणाल्या. गोरखपूर आणि फुलपूर येथील लोकसभेच्या पोटनिवडणूकांच्या मुद्दयावरूनही मायावती यांनी उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर शरसंधान केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी या जागांवर पूर्वी अनैतिकपणे विजय मिळवला होता, हे भाजपलाही माहित होते, असे त्या म्हणाल्या.

दुसरीकडे मायावती यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे भाजपाने म्हटले आहे. राज्यसभेच्या निवडणूकीतल्या पराभवाबद्दल बसपाकडून सबबी दिल्या जात आहेत. पण कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार झाला नाही, असे भाजप नेते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)