नागपूर : भाजप पक्ष कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी सर्वेक्षण करून इतर पक्षातील निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप गळ टाकून बसलेला आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांना पक्षात घेऊन लगेच उमेदवारी दिली. राष्ट्रवादीच्या निरंजन डावखरे यांनाही पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले. भाजपाच्या १२२ आमदारांमध्ये ३० ते ३५ सदस्य काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्री असलेले किंवा त्या क्षमतेचे आहेत. भाजपला अशाप्रकारे इतर पक्षातील लोकांना फोडण्याचे राजकारण योग्य वाटत असेल, पण त्यांनी कार्यकर्ते तयार करावे आणि त्यांना संधी द्यायला हवी, असे पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)