भाजपमध्ये माझी अवस्था अडवाणींसारखी झाली आहे- खडसे

जळगाव – भाजपमध्ये आपली अवस्था राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखी झाली असून पक्षात नव्यांना संधी आणि जुन्यांना मार्गदर्शन असंच चित्र उरल्याचं सांगत खडसेंनी अप्रत्यक्षरित्या सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

जळगाव जिल्हा भाजपच्या संघटन बैठकीत खडसेंचं पुनर्वसन करण्याचा ठराव करावा यासाठी खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन करुन पक्षाच्या शिस्तीचे पालन करण्याचा सल्ला खडसेंनी कार्यकर्त्यांना दिला. ते पुढे म्हणाले की, इतकी वर्ष आपण पक्षासाठी मेहनतीने कार्य केले. अडवाणींची परिस्थितीही तीच आहे. आयुष्यभर त्यांनीही मेहनत केली, आता नव्यांना संधी आणि जुन्यांनी मार्गदर्शन करावं अशी परिस्थिती पक्षात आहे. त्यामुळे माझीची अडवाणीसारखी अवस्था पक्षात असल्याचे खडसे म्हणाले.

खडसेंच्या पुनरागमनावरुन खडसे समर्थकांनी घातलेल्या गोंधळावर नाराजी व्यक्त करत ते यावेत, हे जसं प्रत्येकाला वाटतं, तसं आम्हालाही वाटतं, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. योग्य वेळी ते येतीलच, मात्र त्यासाठी घोषणाबाजी करुन गोंधळ घालणं योग्य नसल्याचे मत गिरिष महाजनांनी व्यक्त केलं. दिवसेंदिवस मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणामुळे भाजपची जोमाने वाढ होत आहे, आगामी काळात राज्यातील अनेक मोठे दिग्गज नेते हे भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत देत भाजप पक्षाची होणारी वाढ पाहता पुढच्या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि अन्य काही पक्ष जगाच्या नकाशावरुन नाहीसे होण्याची भीतीही यावेळी गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)