भाजपबरोबर सुरू असलेली बैठक ही समन्वय बैठक नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खुलासा
नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अन्य मंत्र्यांबरोबर संघाच्या पदाधिकाऱ्यांची सुरू असलेली बैठक ही समन्वय बैठक नाही किंवा या बैठकीत कोणतेही निर्णय घेतले जाणार नाहीत. केवळ एकमेकांच्या कल्पनांचे अदानप्रदान करण्यासाठी ही बैठक होत आहे असे स्पष्टीकरण संघाचे प्रचार प्रमुख अरूणकुमार यांनी आज एका निवेदनाद्वारे दिले आहे. काल पासून हा बैठकींचा सिलसिला सुरू झाला आहे.

काल भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि सहा केंद्रीय मंत्र्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. यात सरकारच्या शैक्षणिक धोरणासह विविध धोरणात्मक बाबींवर चर्चा झाली असे त्यांनी सांगितले. या क्षेत्रांमध्ये काही ठिकाणी संघाचे लोकही काम करतात. त्यामुळे या कामांचा अनुभव व निरीक्षणे एकमेकांच्या निदर्शनास आणण्याचे काम या बैठकीत होते असे त्यांनी म्हटले आहे. सेवा, वैचारीक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक इत्यादी गटांमध्ये ही वेगवेळ्या स्वरूपात चर्चा सुरू असल्याने त्यांनी सांगितले.

सन 2007 सालापासून भाजप आणि संघाच्या अशा गटवार बैठका होत असतात असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. यंदाची ही बैठक 28 ते 31 मे या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. भाजपचे सहसरचिटणीस कृष्ण गोपाल यांच्या अध्क्षतेखाली या बैठका होत आहेत. त्यात भाजपच्या वतीने अमित शहा, विनय सहस्त्रबुद्धे, राम माधव, आणि संघटन सचिव रामलाल हे सहभागी झाले आहेत. सरकारच्यावतीने राजवर्धन राठोड, जे पी नढ्ढा, मनेका गांधी, महेश शर्मा, प्रकाश जावडेकर आणि थावरचंद गहलोत हे सहभागी झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)