भाजपबरोबरची मैत्री एसबीएसपी तोडणार?

बलिया – उत्तरप्रदेश सरकारमधील घटक असणाऱ्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने (एसबीएसपी) 4 जुलैला लखनौमध्ये महत्वाची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत भाजपबरोबरच्या संबंधांचा फेरआढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे एसबीएसपीने भाजपबरोबरची मैत्री तोडण्याच्या हालचाली सुरू केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आपल्याला दुर्लक्षित केले जात असल्याची एसबीएसपीची भावना बनली आहे. त्यातून राज्याचे मंत्री ओमप्रकाश राजभर यांच्या नेतृत्वाखालील हा पक्ष भाजपवर नाराज आहे. स्वत: राजभर काही काळापासून सातत्याने स्वत:च्याच सरकारला लक्ष्य करत आहेत. योगी सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचार वाढल्याचे जाहीर टीकास्त्र त्यांनी काही दिवसांपूर्वी सोडले होते. त्यांच्या टीकेमुळे एसबीएसपी आणि भाजपमधील संबंध ताणले गेले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)