भाजपने साडेचार वर्षांत काही विकासकामे केली नाहीत, ३ महिन्यांत काय करणार- रोहीत पवार

कर्जत: राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथे दाखल झाली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने तयारीला लागली असून त्यांनी भाजप विरोधी सभा घेऊन राज्य पिंजून काढले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर युती सरकारकडून मोठमोठी आश्वासने देण्यात येतील, पण ज्यांनी साडेचार वर्षांत काही विकासकामे केली नाहीत, ते लोकसभा निवडणुकीपूर्वी ३ महिन्यांत काय करणार, असे टीकास्त्र या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी युती सरकारवर सोडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमेरिकेत एका हॅकरने गोपीनाथ मुंडे यांची हत्या ईव्हीएम घोटाळ्यामुळे झाल्याचा आरोप केला आहे. सरकार त्यावर चौकशी करण्याचा काही विचार करत नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आली, तर या सर्व प्रकरणाची चौकशी करू आणि दोषींवर आम्ही कारवाई करू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या सभेत दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)