भाजपने संपर्क साधल्याचा बसप आमदाराचा दावा

बंगळूर – कर्नाटकमध्ये राजकीय गोंधळ सुरू असतानाच भाजपने पाठिंबा मागण्यासाठी संपर्क साधल्याचा दावा बसपचे एकमेव आमदार महेश यांनी आज केला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधल्यावर मी त्यांना आमच्या नेत्या मायावती यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. मी ठामपणे जेडीएसबरोबर आहे, असे महेश येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बसपने जेडीएसशी हातमिळवणी केली. महेश यांच्या रूपाने बसपचा एक उमेदवार निवडूनही आला. निवडणुकीनंतर कॉंग्रेसने सरकार स्थापन करण्यासाठी जेडीएसला पाठिंबा देऊ केला आहे. कॉंग्रेस, जेडीएस आणि बसप मिळून आमच्याकडे 117 आमदार म्हणजे बहुमतासाठी आवश्‍यक संख्याबळ असल्याचा दावा या आघाडीकडून केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)