मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उल्हासनगरमध्ये झालेल्या जाहीर सभेत भाजपवर टीका केली. राममंदिर, कर्नाटकातली सत्तास्थापना, राज्यपालांची भूमिका यावरुन त्यांनी भाजपला लक्ष्य केले.

कर्नाटक म्हणजे ‘कर नाटक’ आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. सर्वाधिक सदस्य असलेल्या पक्षाला सत्तास्थापन करण्याची संधी राज्यपालांनी द्यायला हवी, मात्र कर्नाटकात जे झाले, तो लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

जनसंघापासूनचा कार्यकर्ता असलेल्या कर्नाटकच्या राज्यपालांवर विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
शिवाय असे होणार असेल तर निवडणुका घेण्याऐवजी थेट दिल्लीतून मुख्यमंत्री जाहीर करावा, म्हणजे मोदींना परदेश दौरे थांबवावे लागणार नाहीत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही उद्धव यांनी टीका केली.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)