भाजपने मेहबुबांकडे पाठवले दोन मंत्र्यांचे राजीनामे

जम्मू-काश्‍मीरातील संभाव्य राजकीय पेच टळला
जम्मू – कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या समर्थनावरून वादग्रस्त ठरलेल्या जम्मू-काश्‍मीरमधील दोन मंत्र्यांचे राजीनामे भाजपने आज मंजुरीसाठी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याकडे पाठवले. त्यामुळे त्या राज्यातील संभाव्य राजकीय पेच टळल्याचे मानले जात आहे.

अवघ्या आठ वर्षीय बालिकेवरील बलात्कार आणि तिची हत्या या कठुआमधील प्रकरणावरून संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. अशातच या प्रकरणातील आरोपींच्या समर्थनार्थ काही दिवसांपूूर्वी झालेल्या रॅलीत लाल सिंह आणि चंदरप्रकाश गंगा हे भाजपचे दोन मंत्री सहभागी झाल्याचे समोर आले. त्यामुळे विरोधकांनी जम्मू-काश्‍मीरमधील पीडीपी-भाजप युती सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यातून दोन मंत्र्यांच्या कृतीमुळे मेहबुबा यांच्या नेतृत्वाखालील पीडीपी आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाल्याचे वृत्त पसरले.

या पार्श्‍वभूमीवर, दोन्ही मंत्र्यांनी शुक्रवारी भाजपकडे राजीनामे सादर केले. त्यानंतर पक्षाचे सरचिटणीस राम माधव आज सकाळी तातडीने जम्मूत दाखल झाले. त्यांनी पक्षाच्या राज्यातील महत्वाच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांनी मंजुरीसाठी दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे मेहबुबा यांच्याकडे पाठवण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे दिलासा मिळालेल्या मेहबुबा यांनी योग्यरित्या परिस्थिती हाताळल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)