कल्याण  – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता भाजपकडून गोजरण्याचे काम सुरू आहे. मात्र, भाजपने आमचा मुका घेतला तरी, आता युती होणार नाही,’ असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. डोंबिवलीत ते एका कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच शिवसेना सत्ताधारी नसून फक्त टेकूधारी आहे आणि राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी सत्तेत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

शिवसेनेन स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपने सेनेला गोंजारण्याचे प्रयत्न केले. त्यावर खरमरीत प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आले. बलात्कार, जातीयद्वेष यामुळे देशात आणि राज्यात निर्माण झालेले एकंदरीत वातावरण हे भ्रमनिरास करणारे असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवाय, जिथे पक्षाचा स्वाभिमान दुखावला जाईल, ती पदं आपण स्वीकारणार नसल्याचे सांगत त्यांनी राज्यसभा उपसभापतीपदाच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला. दरम्यान, विरोधकांचाही त्यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. “शिवसेनेने आवाज उठवल्यावर अजगरासारखा निपचित पडलेला विरोधी पक्ष जागा झाला आहे, असे त्यांनी टोला मारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)