भाजपने बंगालमधूून चालते व्हावे

अमित शहांची सभा होणाऱ्या भागात पोस्टरबाजी
कोलकता – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची आज (शनिवार) पश्‍चिम बंगालची राजधानी कोलकत्यात सभा होणार आहे. ती सभा होणाऱ्या भागात भाजपच्या विरोधात पोस्टर्स लावण्यात आले आहेत. भाजपने बंगालमधून चालते व्हावे, अशा घोषणा त्यावर छापण्यात आल्या आहेत.

त्या पोस्टरबाजीवरून भाजप आणि बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसमध्ये जुंपली आहे. संबंधित पोस्टर्स तृणमूूलनेच लावल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर तृणमूलने तो आरोप फेटाळला आहे. आमच्या नियोजित सभेने तृणमूल भयभीत झाला आहे. पोस्टरबाजीतून तेच दिसते. मात्र, बंगाल ही त्या पक्षाची खासगी मालमत्ता नाही. तृणमूलचे दिवस भरत आले आहेत. भाजपकडून दिल्या जाणाऱ्या सुशासनाची प्रतीक्षा आता राज्यातील जनता करत आहे. कोण राहील आणि कोण जाईल हा निर्णय जनताच घेईल, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, त्या पोस्टर्सबाबत तृणमूलने कानावर हात ठेवले आहेत. त्या पोस्टर्सशी आमचे काही देणे-घेणे नाही, असे तृणमूलने म्हटले आहे. दरम्यान, शहा यांच्या सभास्थळी जाणाऱ्या मार्गावर तृणमूलच्या प्रमुख आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मोठमोठे कटआऊटस्‌ उभारण्यात आले आहेत. तसे पोस्टर्स लावण्याचा आम्हाला अधिकारच असल्याचेही तृणमूलने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)