भाजपने देशाच्या छातीत खंजीर खुपसला – राहुल गांधी

नवी दिल्ली: मध्यप्रदेशात नोकरभरती दरम्यान उमेदवारांच्या छातीवर त्यांच्या जातीचे नाव लिहिण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. ‘भाजपने केवळ दलित उमेदवारांच्या छातीवर त्यांच्या जातीचं नाव लिहिलं नसून त्यांनी देशाच्या छातीत खंजीर खुपसला आहे,’ अशी जोरदार टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून भाजपवर ही टीका केली आहे. ‘भाजपच्या जातीयवादी धोरणाने देशाच्या छातीत खंजीर खुपसला आहे. मध्यप्रदेशातील तरुणांच्या छातीवर एससी आणि एसटी लिहून देशाच्या संविधानावर हल्ला करण्यात आला आहे. ही भाजप आणि आरएसएसची विचारधारा आहे. त्यांच्या याच विचारधारेने एकेकाळी दलितांच्या गळ्यात मडके, कंबरेला झाडू बांधला होता. भाजप आणि संघाच्या याच विचारधारेने दलितांना मंदिर प्रवेश नाकारला होता, या विचारधारेलाच आम्ही पराभूत करणार आहोत,’ असे ट्विट राहुल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)