भाजपने जमवली मध्यप्रदेशातील मंदिरांची माहिती

भोपाळ – मध्यप्रदेशातील सत्तारूढ भाजपने त्या राज्यातील मंदिरे, मठ आणि तेथील साधू आणि महंतांची सविस्तर माहिती संकलीत केली आहे. तथापी त्याचा नेमका उद्देश काय हे मात्र अजून त्यांनी गुलदस्त्यातच ठेवले आहे. या वर्षाच्या अखेरीला त्या राज्यात विधानसभांच्या निवडणूका होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून संकलीत करण्यात आलेल्या या माहितीविषयी औत्स्युक्‍य निर्माण झाले आहे.

पक्षाने अशी माहिती जमवल्याच्या वृत्ताला भाजपचे प्रदेश प्रवक्ते रजनिश आगरवाल यांनी दुजोरा दिला. त्या खेरीज भाजपने प्रत्येक बुथनुसार त्यात्या क्षेत्रातील सामाजिक संघटना, त्या भागातील प्रभावशाली व्यक्ती इत्यादी माहितीही संकलीत केली आहे. राज्यातील निवडणूकीच्या पुर्व तयारीची हा एक भाग असून आम्ही आमच्या संपर्क मोहीमेसाठी यादी संकलीत केली आहे असे भाजप प्रवक्‍त्याने सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)