भाजपने चार वर्षात फक्त आवाज करणारे फटाके वाजवले – संजय राऊत 

मुंबई: केंद्रातील आणि राज्यात सत्ता मिळविणा-या भाजपने चार वर्षांमध्ये विविध घोषणा करत फक्त आवाज करणारे फटाके वाजवले आहेत. आम्ही लवंगी लावत नाही, शिवसेनेने दारू गोळा जमा केला आहे. याची वात मातोश्रीवर आहे. उद्धव साहेब ती पेटवतील, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला आहे. हिंदूंचे सण आले का निर्बंध येताता, असे म्हणत त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत फटाके देखील फोडले.

राऊत म्हणाले, वर्षातून एकदाच दिवाळीचा सण येतो. हा सण फटाके वाजवून साजरी केला जातो. मग फटाके वाजविल्याने काय फरक पडतो. जर प्रथा परंपरेवर निर्बंध आणले तर विरोध कसा होतो, हे आपण शबरीमालाचे प्रकरण झाल्यावर पाहिले आहे. त्यामुळे हिंदूंच्या सणांवर निर्बंध आणू नये, असेही ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

न्यायालयाच्या नियमांविरोधात बाळासाहेब उघडपणे बोलायचे. आता आम्ही उघडपणेच करतोय, फटाके फोडण्याच्या नियमाला आम्ही घाबरत नाहीत. आम्ही याबाबतीत अमित शहांना फॉलो करतोय. ते जसे म्हणतात शबरीमाला प्रकरणी कोर्टाने नियम पाळू नका, तसेच आम्ही इकडे म्हणतोय, वेगळं काय आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)