भाजपच्या 2014 मधील यशाची पुनरावृत्ती होणार नाही

जेडीयूच्या नेत्याचे भाकित
कोलकता – भाजपने 2014 मिळवलेल्या यशाची पुनरावृत्ती पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत होणार नाही, असे भाकित जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस पवनकुमार वर्मा यांनी केले. जेडीयू हा भाजपचा मित्रपक्ष असल्याने वर्मा यांच्या वक्तव्याला महत्व आहे.

वर्मा येथे एका कार्यक्रमात बोलत होते. भाजपचे मित्र असणारे राज्याराज्यांमध्ये जवळपास 40 पक्ष आहेत. मात्र, काही महत्वाचे मित्रपक्ष भाजपवर नाराज आहेत, असे म्हणत त्यांनी शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाचा उल्लेख केला. भाजपला यशाची पुनरावृत्ती करणे अवघड जाईल. मात्र, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या जागा प्रस्तावित विरोधी आघाडीपेक्षा अधिकच असतील, असा दावाही त्यांनी केला.

अर्थात, वर्मा यांच्या निशाण्यावर भाजप असल्याचे त्यांच्या इतर वक्तव्यांवरून स्पष्ट झाले. नोटाबंदीचा निर्णय चांगल्या हेतूने घेण्यात आला. मात्र, त्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे झाली नाही. त्यामुळे अनेक समस्या उद्भवल्या, असे ते म्हणाले. आज राष्ट्रवादाचा ज्या पद्धतीने प्रचार केला जातो; त्याविषयीही मला आक्षेप आहे. राष्ट्रवादाबाबत इतर कुणाकडून प्रशस्तीपत्र घेणे मला पटणारे नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)