भाजपच्या सहकारी पक्षांनी बुडणारे जहाज सोडले ; शशी थरूर यांची पंतप्रधानांवर “वन मॅन शो’ची टीका

नवी दिल्ली: “एनडीए’मधील घटक पक्षांमध्ये केंद्रातील “वन मॅन शो’ बाबत खूप असंतोष आहे. त्यामुळेच भाजपच्या काही मित्र पक्षांनी हे बुडणारे जहाज सोडले आहे, अशी टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केली आहे. आपल्या मित्र पक्षांमध्ये असलेली ही असंतोषाची भावना आहे. देशभरातील उर्वरित जनतेच्या मनातही भाजपच्या कामगिरीबाबत नकारात्मक भावना आहे, हे भाजपने ओळखायला हवे, असे थरूर यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारमधील सध्याच्या हुकुमशाही नेतृत्वाबाबत वाढती निराशा आहे. हे स्पष्ट दिसते आहे. “युपीए’मध्ये नेहमीच सामुहिक आणि सामुदायिक नेतृत्व स्वीकारलेले असते. या आघाडीमध्ये सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले जाते, अशी टीकाही थरूर यांनी केली. “एनडीए’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार म्हणजे “वन मॅन शो’ आहे. देशातील लोकशाहीला आता समर्थ पर्याय मिळणे आवश्‍यक बनले आहे, असेही ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आगोदर मार्च महिन्यात चंद्रबाबू नायडू यांचा तेलगू देसम पार्टी आणि उपेंद्र कुशवाहा यांचा राष्ट्रीय लोक समता पार्टी या दोन पक्षांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही पक्ष आता विरोधकांच्या गोटामध्ये सामील झाले आहेत. उत्तर प्रदेशात अपना दल आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी हे दोन्ही असंतुष्ट पक्षही भाजपशी फटकून वागू लागले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)