भाजपच्या सभेची जय्यत तयारी

पिंपरी – मदनलाल धिंग्रा मैदान आजवर दुरवस्थेत आणि दुर्लक्षित राहिले. त्याला आम्हीच जबाबदार असल्याची कबुली देत भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी सभेच्या निमित्ताने मैदानाची दुरूस्ती केली असून, यापुढे मैदान वापरात येईल, अशी माहिती दिली. तर, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील बारा तालुक्‍यातून पक्षाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजेरी लावणार आहेत. सभेची संपूर्ण तयारी धिंग्रा मैदानावर केली असून, ही सभा ऐतिहासिक सभा ठरणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी (दि. 30) पत्रकार परिषदेत सांगितली.

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघात भाजपच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि. 3) फोडण्यात येणार आहे. त्यासाठी निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर सभेचे आयोजन केले आहे. सभेची तयारी करण्याचे नियोजन पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांनी मैदानाची आज प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सभेची सविस्तर माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी आमदार महेश लांडगे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नेते आझम पानसरे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सदस्य विलास मडिगेरी, सरचिटणीस अमोल थोरात, प्रदेश कार्यकारीणी सदस्य उमा खापरे, नगरसेवक नामदेव ढाके, शितल शिंदे, कार्यकर्ते अमित गोरखे, अनुप मोरे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड आदी उपस्थित होते.

भाजपच्याच सभेला उपस्थित राहणार- बापट
मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची एकाच दिवशी एकाच वेळी परंतु वेगवेगळ्या ठिकाणी सभा होणार आहेत. पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी या सभेच्या निमंत्रण पत्रिकेवर पालकमंत्री गिरीश बापट हे देखील उपस्थित राहणार असल्याचे नमूद केले आहे. पालकमंत्री बापट मुख्यमंत्र्यांची सभा सोडून राष्ट्रवादीच्या सभेला कसे काय उपस्थित राहणार, असा प्रश्न उपस्थित झाल्याने याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी प्रथम प्राधान्य हे भाजपच्याच सभेला देणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)