भाजपच्या विजयाचा झेंडा फडकविल्या शिवाय राहणार नाही – पंकजा मुंडे 

कर्डीले हे दबंग आमदार आहेत. त्यांच्याकडे जादूची कांडी

नगर: ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांना अभिवादन करून आज अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ महिला मेळाव्यास संबोधित केले.

-Ads-

पंकजा मुंडे म्हणाल्या,  मुलगी ही वंशाचा दिवा आहे, तिला जपा. सरकारने महिलांना बचतगटांच्या माध्यमातून ताकद देण्याचे काम केले आहे. एकीकडे शेतकरी दुष्काळाच्या चिंतेत कर्ज बाजारी होत असताना दुसरीकडे बचतगटांच्या माध्यमातून महिला स्वावलंबी होवून घेतलेल्या कर्जाची परतफेड करत आहेत. देशात व राज्यातील नेतृत्व महिलांचे सक्षमीकरण करण्याचे काम करत आहे. महिलांचे प्रश्न महिलाच समजू शकते, त्यामुळे आम्ही ३५ महिलांना उमेदवारी दिली आहे. निवडणूकीत महिलांच्या मतदानाला महत्व आहे त्यामुळे महिलांनी पुढे येवून मतदान करावे आणि शहर विकासासाठी भाजपला सत्तेवर आणावे असे आवाहन केले. आजच्या महिला मेळाव्याची उपस्थिती भाजपच्या विजयाचा झेंडा फडकविल्या शिवाय राहणार नाही.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, कर्डीले हे दबंग आमदार आहेत. त्यांच्याकडे जादूची कांडी आहे. त्यांनी रात्रीतून काँग्रेसचे उमेदवार फोडले. भाजपमध्ये त्यांचा प्रवेश करून घेतला. हे चमत्कार फक्त कडीर्लेच करू शकतात. महापालिका झाल्यापासून सत्ताधाऱ्यांनी एकही भरीव काम नगरमध्ये केले नाही. मात्र विकास कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. शहरातील उड्डाणपुलाला भाजप सरकारने निधी दिला. पण, महानगरपालिका सत्ताधाऱ्यांनी ना हरकत दाखला देण्यास टाळाटाळ केली. त्यांच्यामुळेच उड्डाणपूल रखडला आहे. शहराचा विकास करायचा असेल भाजपची सत्ता पाहिजे. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे, असे त्या म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
15 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
4 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
13 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)