भाजपच्या राजवटीत असहिष्णुता – सुशीलकुमार शिंदे

पिंपरी – विविध जातींवर अन्याय होत असतो, त्यावेळी केंद्रातील आणि राज्यातील मायबाप सरकार त्याची दखल घेत नाही, दुर्लक्ष करते. भाजपला सत्तेची मस्ती चढली असून भाजपच्या राजवटीत असहिष्णुता आहे, असे खडेबोल माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी निगडी येथे सुनावले.

संत गुरु रविदास विचार समितीतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांना सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्राधिकरणातील संत गुरू रोहीदास मंदिरामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास शिवसेना भोसरी विधानसभा समन्वयक युवराज कोकाटे, माजी नगरसेवक तानाजी खाडे, शशिकिरण गवळी, सुमन पवळे, जितेंद्र ननावरे, चर्मोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, कष्टकरी कामगार पंचायतचे बाबा कांबळे, दत्तात्रय कांबळे, समितीचे अध्यक्ष संतोष वाघमारे, रमेश साळवे, अरूण लोकरे, विनायक लोकरे आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा गौरवही सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना बदल्याचा डाव पुर्वीच्या भाजप सरकारने केला होता. त्याला त्यावेळी विरोध केला. आत्ता पुन्हा देशात आणि राज्यात तेच सरकार आहे, जे दलित आणि मागासवर्गीयांच्या वर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करीत आहे. एकीकडे सामाजिक समतेच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे दलितांवर अन्याय करायचा, असा खेळ भाजपच्या सरकारने मांडला आहे. सत्तेची मस्ती आलेल्या भाजपची हीच स्थिती राहीली, तर देशात आंदोलनाचा भडका कधी पेटेल सांगता येणार नाही. आम्हालाही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या सरकारला धडा द्यावा लागेल, असा इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला.

समतेचा असामान्य विचार संत रविदास महाराज यांनी समाजाला दिला आहे. त्यातूनच अनेक संत देशात, महाराष्ट्रात निर्माण झाले. राजकारणात लिनता असावी लागते. लिनता असली, तरच लोक तुम्हाला निवडू देतात. खासदार बारणे आणि आमदार ऍड. चाबुकस्वार यांच्याकडे समाजकारण आणि लिनता या दोन्ही गोष्टी असल्यामुळे राजकारणात ते टिकून आहेत, असे गौरवोद्‌गारही सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)