नवी दिल्ली : भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे मुकबधीर असल्याची घणाघाती टीका केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेर आहेत त्यांच्यासमोर राहुल गांधी यांनी सवाशेर होण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
राहुल गांधींना त्यांची घराणेशाहीची परंपरा देशावर लादायची आहे. ते कायम निवडणुकांच्या वेळी लोकांसमोर येऊन बिनबुडाचे आरोप करण्याचे राजकारण करतात असेही चौबे म्हणाले. जर त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे तर मग राहुल गांधी लोकसभेत मूग गिळून गप्प का बसतात? लोकसभेच्या बाहेरही जे भाषण राहुल गांधी करतात ते तर्कहीन का असते असेही प्रश्न चौबे यांनी उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांच्यावर भाजपाने ही टीका केल्याने आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याकडून या टीकेला प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा