भाजपच्या मालवीय यांची नव्हे तर केवळ कॉंग्रेस सेलप्रमुखांची होणार चौकशी

निडणूक आयोगाचा निर्णय


निवडणुकीच्या तारखा फुटल्याचे प्रकरण

नवी दिल्ली – कर्नाटकातील निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर होण्यापुर्वीच भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याकडून ट्‌विटर अकौंटवर जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामुळेच मोठेच वादंग निर्माण झाले होते पण त्याचवेळी कॉंग्रेसच्या आयटी सेलकडूनही या तारखांची माहिती प्रत्यक्ष घोषणेपुर्वीच देण्यात आली असल्याची तक्रार भाजपने केली होती. ही दोन्ही प्रकरणे निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली आहेत. पण निवडणुक आयोगाने मात्र या प्रकरणात केवळ कॉंग्रेसचे आयटी सेल प्रमुख बी श्रीवास्तव यांचीच चौकशी केली जाणार असल्याचे आपल्या आदेशात म्हटले आहे. या प्रकाराच्या चौकशीचा आदेश देणारा जो खलिता उपलब्ध झाला आहे त्यात केवळ श्रीवास्तव यांचेच नाव आहे पण मालवीय यांचे नाव नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

या संबंधात निवडणूक आयोगाने खुलासा करताना म्हटले आहे की या प्रकरणात मालवीय यांनी आधीच आमच्याकडे खुलासा दिला असल्याने त्यांची चौकशी करण्याचा प्रश्‍नच येत नाही. तथापी कॉंग्रेसच्या श्रीवास्तव यांनी या प्रकरणात कोणतेच स्पष्टीकरण दिले नसल्याने त्यांना चौकशीला बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रकरणी कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या दिव्या स्पंदना यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की चौकशी सुरू होण्यापुर्वीच भाजपचे मालवीय यांना निवडणूक आयोगाने निर्दोष ठरवले असून त्यांचे नावही चौकशीच्या आदेशात नाही. यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयीच अनादर निर्माण होत आहे आणि त्यातून त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाचा हा चौकशीचा आदेश म्हणजेच एक विनोद ठरला आहे अशी प्रतिक्रीयाही कॉंग्रेसकडून दिली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)